साताऱ्यातील दोन्ही राजेंची भेट...अन् 'झापुक झुपूक' गाण्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा, पाहा व्हिडिओ - Udayanraje And Shivendra Raje - UDAYANRAJE AND SHIVENDRA RAJE
🎬 Watch Now: Feature Video
Published : Sep 15, 2024, 3:43 PM IST
सातारा Udayanraje And Shivendra Raje : भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje) आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendra Raje) हे निवडणुकीनंतर पहिल्यांदाच एकमेकांना भेटले. यावेळी जलमंदिर पॅलेसमध्ये (Jalmandir Palace) दोघांमध्ये राजकीय खलबते झाली. खरंतर अनेक वर्षानंतर आमदार शिवेंद्रराजे भोसले उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये आल्यानं सातारकरांच्या भुवया उंचावल्या आहेत. या भेटीत शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंना त्यांच्या आवडीचं कॅडबरी चॉकलेटही दिलं. त्यानंतर दोघे एकाच गाडीत बसले. यावेळी शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंच्या स्टाईलनं 'तुझ्या चिकन्या रूपड्याला मन चोरून पाहतय गं.., दिलात झापुक झुपुक वाजत राहतंय गं...' हे गाणं लावलं आणि दोन्ही राजेंच्या गालावर हास्य फुललं. दोन्ही राजेंच्या या भेटीची आणि गाण्याची सध्या सातारकरांमध्ये एकच चर्चा आहे. ही भेट म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या तयारीची नांदी असल्याचं म्हटलं जातंय. वरिष्ठांच्या कडून दोघांना मतभेद मिटवण्याच्या कानपिचक्या दिल्याचीही दबक्या आवाजात चर्चा आहे. मात्र हे दोन्ही राजे हे राजे आहेत त्यांना पक्षानं काही सांगावं आणि त्यांनी ऐकावं असं काही नाही असंही मत काही स्वाभिमानी सातारकर मांडत आहेत.