हैदराबाद : व्होडाफोन आयडिया (Vi) नं भारतात 5G सेवांच्या व्यावसायिक रोलआउटची घोषणा केली. कंपनीनं 2025 च्या तिसऱ्या तिमाहीच्या अहवालात त्यांच्या आगामी योजनांची माहिती दिलीय. कंपनीनं अहवालात दिलेल्या माहितीनुसार, मार्चमध्ये मुंबईत प्रथम व्होडाफोन आयडियाची 5G सेवा सुरू होणार आहे. त्यानंतर कंपनी एप्रिलमध्ये आणखी चार शहरांमध्ये सेवांचा विस्तार करेल. डिसेंबर 2024 मध्ये, Vi नं प्रथम देशभरातील 19 ठिकाणी 5G सेवा सुरू केली होती. उल्लेखनीय म्हणजे, एअरटेल आणि जिओ दोघांनीही 2022 मध्ये 5G सेवा सुरू केल्या आहे.
Vi 5G सेवा मुंबईपासून सुरू करणार
2024-25 आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीच्या तिमाही अहवालाची घोषणा करताना, Vi नं देशात व्यावसायिक 5G सेवा सुरू करण्याच्या त्यांच्या योजना शेअर केल्या. मुंबईनंतर, कंपनी एप्रिल 2025 मध्ये बेंगळुरू, चंदीगड, दिल्ली आणि पटना येथे त्यांच्या सेवांचा विस्तार करण्याची योजना आखत आहे. या टप्प्यात 5G कव्हरेज मिळू शकणाऱ्या इतर कोणत्याही शहरांचं नाव टेलिकॉम कंपनीनं जाहीर केलेलं नाहीय.
"आम्ही देशात गुंतवणूक वाढवत आहोत आणि येत्या तिमाहीत भांडवली खर्चाच्या वापराचा वेग वाढणार आहे. त्याचबरोबर, प्रमुख भौगोलिक क्षेत्रांना लक्ष्य करून 5G सेवां टप्प्याटप्प्यानं सुरू करणार आहोत," असं कंपनीच्या सीईओ अक्षया मुंद्रा यांनी एका निवेदनात म्हटलं आहे.
5G रोलआउट व्यतिरिक्त, Vi नं गेल्या नऊ महिन्यांत 4G कव्हरेजच्या जलद विस्तारावर देखील प्रकाश टाकलाय. कंपनीनं दावा केला की डिसेंबर 2024 पर्यंत कंपनीच्या वापरकर्त्यांची संख्या 1.07 अब्ज झालीय. याव्यतिरिक्त, Vi नं अहवाल दिला आहे, की त्यांनी त्यांचा सरासरी प्रति वापरकर्ता महसूल (ARPU) दुसऱ्या तिमाहीत 166 रुपयांवरून तिसऱ्या तिमाहीत 176 रुपयांपर्यंत वाढवला आहे. ज्यामध्ये 4.7 टक्क्यांची वाढ झाली आहे. पुढं, टेलिकॉम ऑपरेटरनं तिमाहीत 4,000 हून अधिक अद्वितीय ब्रॉडबँड टॉवर्स वाढवले आहेत. विलीनीकरणानंतर एकाच तिमाहीत ही त्यांची सर्वात मोठी भर असल्याचा दावा कंपनीनं केला आहे.
हे वाचलंत का :