मुंबई- मायापुरीतील नायर रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाचा (GBS patient death in Mumbai) जीबीएस सिंड्रोम विषाणुमुळे मृत्यू झाला. हा रुग्ण वडाळा परिसरातील रहिवासी होता.
जीबीएसमुळे मृत्यू झालेला रुग्ण मुंबई महानगरपालिकेतील बीएन देसाई रुग्णालयात वॉर्डबॉय म्हणून काम करत होता. नायर रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार हा रुग्ण बऱ्याच काळापासून आजारी होता. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. जीबीएसची लागण असलेली एक अल्पवयीन मुलगीदेखील नायर रुग्णालयात दाखल आहे. ही मुलगी पालघरची असून दहावीची विद्यार्थिनी आहे.
२० जण व्हेंटिलेटरवर - आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, पुणे विभागात जीबीएसचे आणखी पाच रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील जीबीएस रुग्णांची संख्या १९७ वर पोहोचली आहे. आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार पुणे विभागात नवीन आढळलेल्या पाच रुग्णांमध्ये दोन नवीन रुग्ण आहेत. तर मागील दिवसातील तीन रुग्णांचा समावेश आहे. १९७ रुग्णांपैकी १७२ रुग्णांना जीबीएस आजार झाल्याचं निदान झालं आहे. किमान ४० रुग्ण हे पुणे महानगरपालिका क्षेत्रातील आहेत. तर ९२ रुग्ण पीएमसीमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील आहेत. २९ रुग्ण हे पिंपरी चिंचवड नागरी हद्दीतील आहेत. तर २८ पुणे ग्रामीणमधील आहेत. १०४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ५० रुग्ण आयसीयूमध्ये आहेत. २० जण व्हेंटिलेटरवर आहेत.
देशातील या भागातही जीबीएसचे आहेत रुग्ण- महाराष्ट्राव्यतिरिक्त, देशातील इतर चार राज्यांमध्ये जीबी सिंड्रोमचे रुग्ण आढळले आहेत. आसाममध्ये एका १७ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. ३० जानेवारीपर्यंत पश्चिम बंगालमध्ये ३ जणांचा मृत्यू झाला. यात दोन लहान मुलांचा समावेश आहे. पीडीत कुटुंबांनी जीबीएसनं मृत्यू झाल्याचा दावा केला असला तरी बंगाल सरकारनं अद्याप पुष्टी केलेली नाही. २८ जानेवारी रोजी राजस्थानमधील जयपूरमध्ये लक्षत सिंग नावाच्या मुलाचा मृत्यू.
गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) म्हणजे काय?गुइलेन-बॅरे सिंड्रोम हा एक दुर्मीळ आहे. यामध्ये स्नायू कमकुवत होऊन काही प्रकरणांमध्ये अर्धांगवायू होऊ शकतो. वैद्यकीय तज्ञांनी स्वच्छ पिण्याचे पाणी वापरण्याचा आणि सभोवतालची स्वच्छता राखण्याचा सल्ला दिला. एखाद्याला आजारामुळे अशक्तपणा किंवा अर्धांगवायूसारखी लक्षणे जाणवत असतील तर त्यांनी ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा.
हेही वाचा-