ETV Bharat / technology

सॅमसंगच्या नवीन स्मार्टफोनमध्ये 7000mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग सपोर्ट? - SAMSUNG

सॅमसंग त्यांच्या स्मार्टफोनच्या बॅटरीमध्ये मोठे अपग्रेड देण्याची तयारी करत आहे. एका अहवालानुसार, सॅमसंगच्या आगामी Galaxy S26 Ultra मध्ये 7000mAh बॅटरी मिळण्याची शक्यता आहे.

Galaxy S26 Ultra
Galaxy S26 Ultra (Vikas Negi X Account)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Feb 12, 2025, 10:49 AM IST

हैदराबाद : सॅमसंग त्यांच्या स्मार्टफोनच्या बॅटरीमध्ये मोठे अपग्रेड देण्याची तयारी करत आहे. दक्षिण कोरियाच्या FNNews नुसार, सॅमसंग त्यांच्या आगामी फ्लॅगशिप डिव्हाइस Galaxy S26 Ultra मध्ये 7000mAh बॅटरी देऊ शकते. गेल्या महिन्यात लीक झालेल्या अहवालात म्हटलं आहे, की सॅमसंग Sci/C बॅटरी तंत्रज्ञानावर काम करत आहे. फ्लॅगशिप प्रोसेसरच्या वीज गरजा पूर्ण करण्यासाठी चीनमधील अनेक आघाडीच्या स्मार्टफोन उत्पादक कंपन्या आधीच सिलिकॉन-कार्बन बॅटरीकडं वळल्या आहेत. आता सॅमसंग देखील यामध्ये सामील होऊ शकते.

स्मार्टफोन बाजारात जोरदार स्पर्धा
स्मार्टफोन बाजारात जोरदार स्पर्धा सुरू आहे. काही कंपन्या सॅमसंगच्या आधी 7000mAh पेक्षा जास्त बॅटरी असलेले फोन आधीच देत आहेत. नुबिया रेड मॅजिक 10 प्रो स्मार्टफोनमध्ये 7050 एमएएच बॅटरी आहे. मिड-रेंज सेगमेंटमधील रेडमी टर्बो 4 प्रोमध्ये 7500 एमएएच बॅटरी असू शकते. बॅटरी व्यवस्थापनासाठी सॅमसंग वनयूआय 7 मध्ये उत्तम बॅटरी ऑप्टिमायझेशन देत आहे. कंपनीचे नवीनतम फ्लॅगशिप फोन 13 तास ​​17 मिनिटांपर्यंत बॅटरी लाइफ देत आहेत.

65 वॅट फास्ट चार्जिंग उपलब्ध
अहवालानुसार, गॅलेक्सी एस26 सिरीजमध्ये उत्तम बॅटरी लाइफ मिळण्याची शक्यता आहे. 7000 एमएएच बॅटरी असलेल्या फोनमध्ये कंपनी 65 वॅट फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो, असं मानलं जातंय. सॅमसंगच्या फोनची बॅटरी आणि चार्जिंगबद्दल दिलेली ही माहिती लीकवर आधारित आहे. लाँचच्या वेळी त्यात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुढील काही महिन्यांत कंपनी या नवीन बॅटरी तंत्रज्ञानाबद्दल माहिती शेअर करू शकते, अशी अपेक्षा आहे.

हे वाचलंत का :

  1. या महिन्यात Xiaomi 15 Ultra स्मार्टफोन लाँचची शक्यता, 50 मेगापिक्सेल क्वाड कॅमेरासह
  2. वनप्लस रेड रश डेज सेल सुरू, स्मार्टफोन, टॅब्लेट, वाॅचवर मिळतेय बंपर सूट
  3. वनप्लस वॉच 3 अमेरिका आणि युरोपमध्ये होणार लाँच, भारतात कधी होणार लॉंच?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.