मुंबई : प्रसिद्ध यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया त्याच्या वादग्रस्त विधानामुळे कायदेशीर अडचणीत अडकत आहे. पालकांवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्यानंतर, युट्यूबर रणवीर अलाहाबादियावर एकामागून एक कारवाई होत आहे.आसाम आणि इंदूर पोलिसांनी बीअर बायसेप्सविरुद्ध तक्रार दाखल केली गेली आहे. तसेच मुंबई पोलिस आणि राष्ट्रीय महिला आयोगानं रणवीर-समय रैना यांना समन्सही पाठवला आहे. याशिवाय, महाराष्ट्र सायबर सेलनं 'इंडियाज गॉट लेटेंट'वर आलेल्या पाहुण्यांविरुद्धही तक्रार दाखल केली आहे. रणवीरविरुद्ध सतत सोशल मीडियावर चर्चा होत आहे. 'इंडियाज गॉट लेटेंट' या शोवरील वादानंतर, राष्ट्रीय महिला आयोगानं (NCW) रणवीर अलाहाबादिया समय रैना आणि इतर अनेकांना चौकशीसाठी समन्स बजावले.
रणवीर अलाहाबादियाच्या अडचणीत वाढ : तसेच 30 लोकांना 17 फेब्रुवारी रोजी आयोगासमोर हजर राहावं लागेल. रणवीर, समय रैना, अपूर्व मखीजा, जसप्रीत सिंग आणि आशिष चंचलानी, शोचे निर्माते तुषार पुजारी आणि सौरभ बोथरा यांसारख्या कंटेंट निर्मात्यांनी केलेल्या अश्लील आक्षेपार्ह विधानाला आयोगानं गांभीर्यानं घेतलं आहे. एनसीडब्ल्यूच्या पत्रात सांगितलं गेलं आहे की, 'विशेषतः ज्या समाजात आपण राहतो त्यामध्ये समानता आणि एकमेकांबद्दल आदराची भावनानं पाहिल्या जात असते. या विधानामुळे सार्वजनिक आक्रोश निर्माण झाले आहे. हे विधान प्रत्येक व्यक्तीसाठी मिळणाऱ्या प्रतिष्ठेचे आणि आदराचे उल्लंघन करते.'
National Commission for Women (NCW) summons YouTuber Ranveer Allahabadia, Samay Raina, and others over derogatory remarks; hearing scheduled for February 17 pic.twitter.com/m7Y9Xmez5q
— ANI (@ANI) February 11, 2025
'या' प्रकरणी कधी होईल सुनावणी : राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या निर्देशानुसार, 'इंडियाज गॉट लॅटेंट'वरील कंटेंट प्रोवाइडरनं केलेल्या वादग्रस्त विधानांवर सुनावणी निश्चित करण्यात आली आहे. ही सुनावणी 17 फेब्रुवारी रोजी नवी दिल्लीतील राष्ट्रीय महिला आयोगाच्या कार्यालयात होणार आहे. तसेच एका पोलीस अधिकाऱ्याच्या हवाल्यानं सांगितलं आहे, सायबर सेल पहिल्या भागापासून शोमध्ये सहभागी झालेल्या सुमारे 30 पाहुण्यांना समन्स जारी केला आहे. रणवीर अलाहाबादियानं शोमध्ये केलेल्या अश्लील विधानामुळे वाद निर्माण झाला, यानंतर सायबर सेलनं स्वतःहून याची दखल घेतली आणि एफआयआर नोंदवली. तसेच सायबर सेलला तपासादरम्यान असं आढळून आलं की, कार्यक्रमाशी संबंधित इतर सहभागी आणि पाहुणे अश्लील आणि आक्षेपार्ह भाषा वापरत आहेत. पोलीस अधिकाऱ्यानं पुढं सांगितलं की, सायबर सेलनं आयटी कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. कॉमेडी शोचे सर्व भाग (एकूण 18) काढून टाकण्याची मागणी केली जात आहे.
हेही वाचा :