निकालापूर्वीच मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयाबाहेर जल्लोषाची तयारी, पाहा व्हिडिओ - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024
🎬 Watch Now: Feature Video


Published : Nov 23, 2024, 8:41 AM IST
मुंबई - राज्याच्या पंधराव्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज घोषित होत असताना भाजपा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेश कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात जल्लोषाची तयारी करण्यात आली आहे. जसजसे निवडणुकीचे निकाल जाहीर होतील तसतसा येथील भाजपा कार्यकर्त्यांचा उत्साह वाढत जाणार आहे. महायुतीत भाजपाबरोबर राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा समावेश आहे. महायुतीत घटक पक्ष असलेल्या भाजपानं यापूर्वीच बहुमतानं सरकार येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. महायुतीत मुख्यमंत्री कोण याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र, भाजपानं अधिक जागा लढविल्या असल्यानं भाजपाकडं मुख्यमंत्री पदासाठी भाजपाकडून मुख्यमंत्री पदावर दावा केला जातो. हरियाणामध्ये भाजपानं सत्ता स्थापन केली आहे. त्यानंतर भाजपा विजयाची पुनरावृत्ती करेल, असा भाजपाच्या नेत्यांना विश्वास आहे.