मुंबईतील घाटकोपर परिसरात भूस्खलनाची घटना; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, पाहा व्हिडिओ - Landslide in Ghatkopar - LANDSLIDE IN GHATKOPAR
🎬 Watch Now: Feature Video
Published : Apr 13, 2024, 11:14 AM IST
मुंबई Landslide in Ghatkopar : मुंबईतील घाटकोपर पश्चिम परिसरात काल रात्री दहा वाजेच्या सुमारास भूस्खलनाची घटना घडलीय. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलानं घटनास्थळी पोहचून बचाव कार्यास सुरवात केली. परिसरातील हिमालय सोसायटी, वाल्मिक नगर, गोविंद नगर आणि दातार कंपाउंड येथील झोपड्यांवर भूस्खलन झालंय. घटनेनंतर खबरदारीच्या उपाय योजनेसाठी परिसरातील 10 ते 12 झोपड्या रिकाम्या करण्यात आल्या आहेत. तसंच नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आलीय. सर्व स्थानिक रहिवाशी सुरक्षित असल्याची खात्री पालिका प्रशासनाकडून करण्यात आलीय. घाटकोपर परिसरातील स्थानिकांच्या म्हणान्यानुसार पावसळ्यात असा प्रकार होत असतो. मात्र आता पावसाळा नसतांना असं घडलं तर आमच्यासाठी धोकादायक आहे. तसंच पावसाळ्यापूर्वी अशा प्रकारच्या दुर्घटना घडायला लागल्या तर पावसाळ्यात किती दुर्घटना घडतील. त्यामुळं पालिका प्रशासनानं याकडं लक्ष देऊन पावसाळ्यापूर्वी यावर उपाययोजना करावी अशी मागणी करण्यात आलीय.