पुण्यात 'जागतिक योग दिवस' उत्साहात साजरा; मंत्री मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटील यांचा सहभाग - International Yoga Day 2024 - INTERNATIONAL YOGA DAY 2024
🎬 Watch Now: Feature Video


Published : Jun 21, 2024, 12:38 PM IST
पुणे Yoga Day : आज 'जागतिक योग दिवस' असून पुण्यातील विविध महाविद्यालयात तसंच सामाजिक संस्थांच्या माध्यमातून योग दिनाचं आयोजन करण्यात आलंय. कोथरूड येथील महेश विद्यालयात केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ तसंच राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे देखील योग दिनानिमित्त कार्यक्रमात सहभागी होत योग करताना पाहायला मिळाले. यावेळी मुरलीधर मोहोळ म्हणाले, ''गेल्या 10 वर्षापासून आमच्या प्रतिष्ठानच्या वतीनं जागतिक योग दिवस साजरा केला जातोय. संस्कृती प्रतिष्ठान व पतंजली योग समितीच्या वतीनं शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं." यावेळी त्यांना मराठा आरक्षणाच्या बाबत विचारलं असता ते म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण तसंच ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी महायुती सरकार सक्षम आहे.