महाराष्ट्रात गोध्रासारखा प्रकार, प्रकाश आंबेडकर यांची टीका; सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरीची मागणी - PRAKASH AMBEDKAR
🎬 Watch Now: Feature Video


Published : Dec 18, 2024, 10:13 PM IST
पुणे : परभणीत न्यायालयीन कोठडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांच्या झालेल्या मृत्यू प्रकरणी राज्यभरातून विविध प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे. सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणावरून आज प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा पोलीस यंत्रणेवर टीका केली. तसंच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला एक कोटीची मदत करावी. तसंच त्यांच्या घरातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी द्यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली. सूर्यवंशींच्या कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्यासह जखमींना २५ लाख रुपयांची मदत शासनाने करावी. सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलीस कस्टडीत झाला होता. त्यामुळं हे पैसे पोलिसांकडून वसूल करावेत, असंही प्रकाश आंबेडकर म्हणालेत.
एक कोटीची करा मदत : प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले, "सव्वा महिन्याच्या बाळंतीण महिलेला घरात घुसून पोलिसांनी मारहाण केली. नवीन गोध्रा घडवण्याचा कोणाचा प्रयत्न आहे का? पोलिसांच्या मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू झाला. सरकारने सोमनाथच्या कुटुंबाला एक कोटी रुपयांची मदत दिली पाहिजे. तसंच त्याच्या कुटुंबातील एकास सरकारी नोकरीत घेतलं पाहिजे".