पाण्याचा अंदाज चुकल्यानं पोहायला गेलेल्या चार मित्रांचा खदाणीत बुडून मृत्यू - Four youth drowned - FOUR YOUTH DROWNED
🎬 Watch Now: Feature Video
Published : Aug 6, 2024, 10:07 PM IST
नांदेड Four youth drowned : नांदेडमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. खदानीत पोहण्यासाठी गेलेल्या पाच जणांपैकी चार मित्रांचा बुडून मृत्यू झाला आहे. चारही मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. या घटनेमुळं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना नांदेड शहराजवळील झरी गावच्या शिवारात घडली. चारही तरुण नांदेड शहरातील देगलुर नाका परिसरातील रहवासी आहेत. शेख फझैल (18), काझी मुजामिल (18), सय्यद सिद्दीकी (18), शेख अफान, (18) अशी मृत तरुणाची नावं आहेत. ही घटना आज सकाळी 10 च्या सुमारास घडली, अशी माहिती पोलिसांनी दिलीय. पोलीस या प्रकरणाचा तपास करत करणार असल्याच अतिरिक्त पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार यांनी म्हटलंय. मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड येथील पाच मित्र खदानीत पोहण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना पाण्याचा अंदाज न आल्यानं त्यांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेत एक जण सुखरूप बचावला आहे.