राज्यातील पहिली अल्पसंख्याक युवा संसद पुण्यात - अल्पसंख्याक युवा संसद पुणे
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/17-02-2024/640-480-20772747-thumbnail-16x9-minority-youth-parliament.jpg)
![ETV Bharat Marathi Team](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/authors/maharastra-1716536262.jpeg)
Published : Feb 17, 2024, 11:32 AM IST
पुणे Minority Youth Parliament Pune : शहरातील नेहरू मेमोरियल हॉल येथे राज्यातील प्रथमच अल्पसंख्याक युवा संसदेचे आयोजन करण्यात आले होते. या संसदेला अल्पसंख्याक समाजातील युवकांचा सहभाग लक्षणीय होता. यापैकी अनेक युवकांनी मंचावर उपस्थित असलेल्या सर्वच पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांना अल्पसंख्याक समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय व सुरक्षेच्या धोरणाविषयी प्रश्न विचारले. त्यावेळेला अनेक नेत्यांनी मंचावरून युवकांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. अल्पसंख्याकांच्या आरक्षण व संरक्षणासंदर्भात विशेष प्रश्न उपस्थित करण्यात आले.
प्रत्येत शहरात होता युवा संसद : अल्पसंख्याक युवा संसदेचे राष्ट्रीय संयोजक खिसाल जाफरी यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सांगितले की, "भविष्यामध्ये अल्पसंख्याक समाजाच्या युवकांना सोबत घेऊन देशाच्या प्रत्येक शहरांमध्ये अशा पद्धतीचे अल्पसंख्याक युवा संसदेचे आयोजन करण्यात येईल आणि या संस्थेच्या मार्फत अल्पसंख्याक समाजाचे प्रश्न, अडचणी व समस्या संदर्भात चर्चा व धोरण अवलंबण्यात येईल."