भाजपाच्या वतीनं दिपोत्सव; पंकजा मुंडे यांनी जागवल्या 'त्या' वेळेच्या आठवणी - Ayodhya Pran Pratishtha
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jan 22, 2024, 10:52 PM IST
बीड Pankaja Munde On Ayodhya Ram Mandir Inauguration: अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते श्री रामाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. आज भाजपाच्या वतीनं श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त आयोजित केलेल्या दिपोत्सव कार्यक्रमास मंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी उपस्थिती लावत दोघांनीही एकत्रित दिवे पेटवले. देशात आणि राज्यात हा उत्सव दिवाळीसारखा साजरा झालाय. प्रत्येक रामभक्तासाठी हा फार मोठा सण आहे. यापुढे नक्कीच देशात रामराज्य येईल अशी अपेक्षा देखील पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आहे.
दोन दिवस रथयात्रेत सहभागी : देशात आज दिवाळीचं वातावरण आहे. सर्वत्र उत्साह पाहायला मिळतोय, या उत्साहात आपण सर्वजण सहभागी झाला आहात. परंतु यासाठीचा संघर्ष मोठा होता. त्यावेळी दिवंगत प्रमोद महाजन आणि दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या समवेत मी देखील दोन दिवस रथयात्रेत सहभागी झाले होते. हे सर्व काय आहे हे न कळण्याचं ते वय होतं माझं, परंतु आज मी त्यावेळी किती मोठ्या कार्यात सहभागी होते हे लक्षात येतंय, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.