श्रावण सोमवारनिमित्तानं मुख्यमंत्र्यांनी घेतलं श्री क्षेत्र भीमाशंकरचं दर्शन - Shravan Somvar 2024 - SHRAVAN SOMVAR 2024
🎬 Watch Now: Feature Video
Published : Sep 2, 2024, 10:50 PM IST
पुणे/भीमाशंकर Shravan Somvar 2024 : श्रावण महिन्यातील शेवट अर्थात पाचव्या सोमवारी श्री क्षेत्र भीमाशंकर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवलिंग गाभाऱ्यात दुग्धाभिषेक घालून पूजन आणि आरती केली. भीमाशंकर येथे श्रावणी सोमवारनिमित्त लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनावणे उपस्थित होते.
भीमाशंकर येथे येणाऱ्या भाविकांना आंघोळीसाठी ज्ञानव्यपी कुंडाजवळ महत्वपूर्ण व्यवस्था व्हावी, अशी प्रामुख्यानं मागणी भीमाशंकर व्यवस्थापनेच्या वतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडं करण्यात आली. यावेळी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, "क्षेत्र भीमाशंकर या प्राचीन मंदिरात आल्याने मोठे भाग्य लाभते. दर्शन घेतलं आणि साकडं घातलं की, राज्यातला बळीराजा सुखी होऊ दे, चांगला पाऊस होतोय तर त्यात चांगले उदंड पीक येऊ दे, महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकास् भीमाशंकरच्या आशीर्वादाने सुख, समृद्धी लाभू दे."