बीड प्रकरणात कोणीही दोषी असो त्यांना शिक्षा होणारच- किरीट सोमैय्या - KIRIT SOMAIYA NEWS
🎬 Watch Now: Feature Video
Published : Dec 30, 2024, 2:15 PM IST
मनमाड (नाशिक) - "सध्या देशात गाजत असलेले बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः लक्ष घालून माहिती घेत आहेत. यात जे कोणी दोषी असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई होईल," अशा विश्वास भाजपाचे माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी व्यक्त केला.
"मालेगाव हे सध्या रोहग्यांचे आश्रयस्थान बनले आहे. हे सर्व पुरावे मी आज सायंकाळी माध्यमातून सर्व देशासमोर ठेवेल. यातील आरोपींना शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करणार आहे, " अशी माहिती भाजपाचे ज्येष्ठ नेते किरीट सोमैय्या यांनी दिली. ते मनमाडमध्ये बोलत होते. कथित व्होट जिहाद भाग दोन प्रकरणात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यासाठी ते मालेगावला जाण्यासाठी मनमाड मार्गे आले असता किरीट सोमैय्या यांनी माध्यमांशी संवाद साधला. माजी खासदार सोमैय्या म्हणाले, " महादेव अॅपद्वारेदेखील मोठा घोटाळा झाला असून याचादेखील मी तपास सुरू केला आहे. लवकरच याबाबतदेखील माहिती घेणार आहे. मालेगाव येथील नामको बँकेतून व्होट जिहादसाठी मोठ्या प्रमाणात करोडो रुपयांचा आर्थिक व्यवहार करण्यात आला. या प्रकरणी आज मालेगाव येथे जिल्हाधिकारी तहसीलदार आयुक्त यांच्यासोबत माझी बैठक आहे. यासाठी मी मालेगावला चाललो आहे".