राज्यातून पहिली महिला मुख्यमंत्री माझ्या बायकोला करणार - अभिजित बिचुकले - अभिजित बिचुकले
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/14-02-2024/640-480-20750856-thumbnail-16x9-abhijitphoto.jpg)
![ETV Bharat Marathi Team](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/authors/maharastra-1716536262.jpeg)
Published : Feb 14, 2024, 7:28 PM IST
पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून राज्यात पहिली महिला मुख्यमंत्री म्हणून निवडून यावं अशी चर्चा सुरू आहे. अनेक महिला प्रतिनिधींची नावंही पुढे येत आहेत. (Female CM of Maharashtra) अशातच बिग बॉस फेम कवी मनाचे अभिजित बिचुकले यांनी याबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. ते म्हणाले की, येत्या काळात राज्यात महिला मुख्यमंत्री म्हणून माझी पत्नी अलंकृता बिचुकले हीच बनणार आहे.
बिचकुले लवकरच चित्रपटातून झळकणार : नेहमीच राजकीय मतांनी, आपल्या भूमिकेनं सर्वांचं लक्ष वेधून घेणारा बिग बॉस फेम अभिजित बिचुकले आता लवकरच चित्रपटातून झळकणार आहे. (Bigg Boss fame) आज व्हॅलेंटाईन दिवसानिमित्त त्यांनी गायलेलं, लिहिलेलं आणि स्वतः सादर केलेल्या रोमँटिक गीताचं प्रदर्शन पुण्यात करण्यात आलं. या गीताला रसिकांनी भरभरून प्रतिसाद देण्याचं आवाहन बिचुकले यांनी यावेळी केलं. तसंच लवकरच आपण चित्रपटात झळकणार असल्याचं जाहीर केलं.