अनन्या, सारा आणि जान्हवी अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग पार्टीसाठी रवाना - Anant Radhika Pre wedding - Anant Radhika Pre wedding - ANANT RADHIKA PRE WEDDING
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/29-05-2024/640-480-21584412-456-21584412-1716962805691.jpg)
![ETV Bharat Marathi Team](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/authors/maharastra-1716536262.jpeg)
Published : May 29, 2024, 5:27 PM IST
मुंबई - Anant Radhika Pre wedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाआधीच्या सेलिब्रेशनसाठी जगभरातील तारे तारकांची उपस्थिती पाहायला मिळणार आहे. यासाठी अनेक बॉलिवूड स्टार्स रवाना होत आहेत. सारा अली खान, जान्हवी कपूर आणि अनन्या पांडे यांचं नावही बॉलिवूडच्या पाहुण्यांच्या यादीत नवीन जोडलं गेलं आहे.
29 मे रोजी सारा अली खान स्टाईलमध्ये मुंबई सोडताना दिसली. तिनं बेज रंगाचा क्रॉप टॉप घातला होता ज्यात जुळणारी ट्रॅक पँट आणि तिच्या कमरेभोवती जॅकेट बांधले होते. प्री-वेडिंग सेलिब्रेशनसाठी जाताना विमानतळावर अनन्या पांडे देखील दिसली. तिनं ब्लॅक क्रॉप जॅकेटसह निळ्या रंगाचा डेनिम आउटफिट निवडला होता. अनन्याने पापाराझींना अभिवादन केलं आणि तिच्या फ्लाइटमध्ये बसण्यापूर्वी काही फोटोही दिले.
जान्हवी कपूरही विमानतळावर अंबानींच्या पार्टीसाठी निघताना दिसली. 31 मे रोजी तिचा आगामी चित्रपट मिस्टर आणि मिसेस माही रिलीज होणार आहे. त्यापूर्वी ती या स्टार स्टडेड शाही सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहे. हा सोहळा इटलीमध्ये सुरू होणार असून 1 जून रोजी फ्रान्समध्ये समाप्त होणारा हा विलक्षण कार्यक्रम संस्मरणीय असेल.
हेही वाचा -
एआर रहमान यांनी पूर्ण केला 'रायन'चा बॅकग्राऊंड स्कोअर, धनुषनं शेअर केली पोस्ट - AR Rahman