रील बनवताना 300 फूट खोल दरीत कोसळली; रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी पण जीव वाचवण्यात अपयश - Aanvi Kamdar
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jul 18, 2024, 11:56 AM IST
रायगड Aanvi Kamdar Dies : माणगाव तालुक्यातील निजामपूर विभागातील अर्धवट राहिलेला कुंभे जलविद्युत प्रकल्प, कुंभे बोगदा आणि त्यातील कुंभे गावापर्यंत पोहोचताना लागणारे मनमोहक धबधबे हे पर्यटकांना भुरळ घालू लागलेत. मात्र, याच कुंभे धबधब्यात पडून रीलस्टार अन्वी कामदार या 26 वर्षीय तरुणीचा मृत्यू झालाय. हा धबधबा बघायला ती मुंबई येथून आपल्या 7 सहकाऱ्यांसह आली होती. मात्र, रील बनवण्याच्या नादात तिचा तोल गेला अन् ती 300 फूट खोल दरीत कोसळली. याची माहिती मिळताच माणगाव पोलीस उपविभागीय अधिकारी, माणगाव पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे आणि पोलीस टीम, माणगाव तहसीलदार विकास गारूडकर, साळुंके रेस्क्यू टीम माणगाव, सिस्केप रेस्क्यू टीम महाड, कोलाड रेस्क्यु टीम, महावितरण कर्मचारी, आरोग्य यंत्रणा यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जवळपास 6 तासांच्या प्रयत्नानंतर अन्वीला बाहेर काढण्यात आलं. मात्र, रुग्णालयात नेण्यापूर्वी तिचा मृत्यू झाला. या अपघातामुळं माणगाव तहसीलदार तसंच माणगाव पोलीस निरीक्षकांनी पर्यटनाचा आनंद घ्या, पण स्वतःचा जीव धोक्यात घालू नका, जीवावर बेतेल असं वर्तन करू नका, असं आवाहन केलंय.