ETV Bharat / entertainment

एक्स पती रितेश कुमारनं राखी सावंत आणि आदिल खान दुर्रानीबाबत केला धक्कादायक खुलासा - Rakhi Sawant - RAKHI SAWANT

Rakhi Sawant Ex Husband Ritesh : राखी सावंतचा एक्स पती रितेश कुमारनं तिच्या तब्येती बाबत एक खुलासा करताना आदिल खान दुर्रानीबाबत एक विधान केलं आहे. आता त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Rakhi Sawant Ex Husband Ritesh
राखी सावंत एक्स पती रितेश (राखी सावंत (instagram))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 18, 2024, 1:03 PM IST

मुंबई - Rakhi Sawant Ex Husband Ritesh : बॉलिवूड ड्रामा क्वीन राखी सावंतला नुकतेच मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. राखी सावंतचा पहिला पती रितेश कुमार आणि तिचा भाऊ राकेश सावंत यांनी याबद्दलची माहिती दिली होती. राखीची प्रकृती अजूनही नाजूक असल्याचं रितेश कुमारनं आता सांगितलं आहे. शनिवार, 18 मे रोजी राखीवर शस्त्रक्रिया होणार असल्याचं आता समजत आहे. दरम्यानं रितेशनं आदिल दुर्रानीबद्दल आणखी एक मोठा खुलासा केला आहे, जे ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. रितेशनं एका मुलाखतीत सांगितलं की, "राखी मानसिकदृष्ट्या ठीक आहे, परंतु काही गोष्टींमुळे ती खूप अस्वस्थ झाली आहे. यामुळे तिला एकटेपणा जाणवत आहे. तिला अनेक समस्यांना सामोरे जावं लागत आहे. ती रोज रात्री उठते आणि रडायला लागते. तिला भीती वाटते की आपल्याला काहीही होऊ शकतं."

राखी सावंतच्या पहिल्या पतीनं केला खुलासा : पुढं त्यानं म्हटलं, राखीनं मला मला सांगितलं की, "जर तिला काही झालं तर आदिलला सोडू नको. तू बदला घे आणि त्याला धडा शिकव. त्याचा डोळा तिच्या मालमत्तेवर असून त्याला ते सर्व हडपायचे आहे. आता राखी खूप उदास आहे." याशिवाय त्यानं सांगितलं की, "राखी लवकरच बरी होणार आहे. तिच्या तब्येतीबद्दल जास्त बोलू शकत नाही, पण तिनं मला तिच्या आरोग्याबद्दलची अपडेट्स देण्यास सांगितलं आहे. ती हॉस्पिटलमधून बाहेर पडताच सर्व काही सांगेल. शस्त्रक्रियेनंतर, डॉक्टर ट्यूमर तिला दाखवेल. राखी सावंतला छातीत तीव्र वेदना होत असल्यानं तिला मंगळवारी रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिचे काही रुग्णालयातील फोटो समोर आले होते.

राखी सावंत आणि आदिल खान दुर्रानीचं प्रकरण : राखी सावंतला आतापर्यत आदिल खाननं घटस्फोट दिलेला नाही. त्यानं 'बिग बॉस 12' फेम सोनी खानबरोबर लग्न केलं आहे. आदिल अनेकदा राखीला कॉल करून धमकवत असतो, असं ती नेहमीच सांगते. राखीनं यापूर्वी आदिलविषयी एफआयआर दाखल केली होती. याप्रकरणी त्याला तुरुंगात 6 महिने राहावे लागलं होतं. यानंतर आदिल तुरूंगातून बाहेर आल्यानंतर त्यानं देखील राखीवर खूप काही आरोप लावले होते. दरम्यान, राखी शेवटी मराठी 'बिग बॉस'मध्ये दिसली होती. याशिवाय ती एका म्युझिक अल्बममध्ये दिसली आहे.

हेही वाचा :

  1. कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारतीय स्टार्सचा जलवा... - Cannes 2024 Film Festival
  2. कान्सच्या रेड कार्पेट पदार्पण करण्यापूर्वी थाय हाय स्लिट गाऊनमध्ये झळकली कियारा अडवाणी - Cannes Film Festival 2024
  3. 'हे' पाच भयपट आणि वेब सीरीज पाहून तुम्हीही व्हाल थक्क... - five horror movies and web series

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.