लखनऊ : एकाच कुटुंबातील 5 महिलांची हत्या करण्यात आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ इथल्या ठाणे नाका परिसरातील एका हॉटेलमध्ये घडली. या कुटुंबातील मुलानं या हत्येमागील कारण सांगितल्यानं ऐकणाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. विशेष म्हणजे मुलानंच या हत्येची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालं. त्यानंतर पोलिसांनी पाचही मृतदेह पुढील कारवाईसाठी रुग्णालयात पाठवून दिले.
एकाच कुटुंबातील आई आणि 4 मुलींची वडिलांनी केली हत्या : लखनऊ इथल्या ठाणे नाका परिसरातील एका हॉटेलमध्ये आई आणि 4 मुलींची हत्या करण्यात आल्याची माहिती या कुटुंबातील मुलानं पोलिसांना दिली. त्यामुळे माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मुलाला ताब्यात घेतलं. ही हत्या वडिलांनीच केल्याचं संशयित आरोपी अर्शदनं पोलिसांना सांगितलं. खून करुन वडील कुठंतरी निघून गेल्याचं त्यानं पोलिसांना सांगितलं. यावेळी जाताना वडिलानं आत्महत्या करणार असल्याचं आपल्याला सांगितलं, असा दावा अर्शदनं केला. अर्शदच्या या माहितीनंतर पोलिसांनी त्याचे वडील बदरचा शोध सुरू केला आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
हॉटेलमध्ये केली मारेकऱ्यांनी महिलांची हत्या : पाच महिलांची हत्या झाल्याची घटना कळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस अधिकाऱ्यांनी गठनास्थळावरुन पुरावे गोळा केले. या हत्या प्रकरणाचा पोलिसांनी सविस्तर तपास सुरू केला आहे. हत्येबाबत हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष सुरेंद्र शर्मा यांनी सांगितलं की, "हे कुटुंब 30 डिसेंबरच्या रात्री 7:00 वाजता लखनऊला आलं. ओळखपत्र आणि आधार कार्ड जमा केल्यानंतर ते हॉटेलमध्ये थांबले होते. दुसऱ्या दिवशी 31 डिसेंबरला संपूर्ण कुटुंब हॉटेलमध्ये थांबलं. या कालावधीत कोणत्याही प्रकारची संशयास्पद घटना घडली नाही. मात्र खून झाल्याची माहिती 1 जानेवारीला सकाळी मिळाली. सकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान पोलिसांनी पाच महिलांचे मृतदेह खोलीतून बाहेर काढून पोस्टमार्टमसाठी पाठवले. यावेळी अर्शदनं सांगितलं की, त्याच्या संपूर्ण कुटुंबाची हत्या त्याचे वडील बदर यांनी केली. खून करून तो रात्री उशिरा हॉटेलमधून पळून गेला. निघताना त्यानं आपण आत्महत्या करणार असल्याचं सांगितलं. सकाळी पोलिसांना खुनाची माहिती अर्शदनंच दिली. या हत्याकांडामागील मुख्य कारण काय, याबाबत अद्याप काहीही समोर आलेलं नाही. अर्शद स्पष्ट बोलत नाही. तो वारंवार आपला जबाब बदलत आहे."
हेही वाचा :