ETV Bharat / entertainment

चेंगराचेंगरीत झालेल्या मृत्यूला न्याय द्यावा, अशी मागणी करत अल्लू अर्जुनच्या घरावर झाली दगडफेक - ALLU ARJUN AND PUSHPA 2

अभिनेता अल्लू अर्जुनच्या घरावर दगडफेक आणि तोडफोड केल्याप्रकरणी पोलिसांनी 6 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Allu Arjun
अल्लू अर्जुन (अल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला (IANS-ANI))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Dec 23, 2024, 10:03 AM IST

मुंबई : संध्या थिएटरबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्याच्या घटनेत साऊथ स्टार अल्लू अर्जुनच्या घरी तोडफोड करण्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी उस्मानिया यूनिवर्सिटी ज्वाइंट एक्शन कमेटीच्या सहा सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हैदराबादमधील वेस्ट जोनचे डीसीपी, यांनी सांगितलं की, 'आरोपींवर कठोर कारवाई सुरू करण्यात आली आहे. तोडफोडची घटना दुपारी 4.45 च्या सुमारास घडली.' दरम्यान काही लोक घोषणाबाजी करत आणि फलक घेऊन अल्लू अर्जुनच्या घोषणाबाजी करत होते. यानंतर आंदोलकांपैकी एक व्यक्तीनं घरात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यानं वॉल कंपाउंटच्या वरती चढून टोमॅटो फेकण्यास सुरुवात केली.

अल्लू अर्जुनच्या घरी दगडफेक : यानंतर त्या व्यक्तीला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तिथून जाण्यासाठी सांगितलं , तेव्हा त्यानं त्यांच्यावर हल्ला केला. याशिवाय रॅम्पवर लावलेल्या काही फुलांच्या कुंड्या देखील या घटनेदरम्यान फुटल्या. आता सोशल मीडियावर घटनास्थळावरील फुटेज समोर आलं आहे. या दगडफेकीमुळे अल्लू अर्जुनच्या घराबाहेर खूप नुकसान झालं आहे. या घटनेबाबत अधिकाऱ्यानं सांगितलं की, "या घटनेची माहिती मिळताच जुबली हिल्स पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि सहा जणांना ताब्यात घेतलं." तसेच हे सर्वजण उस्मानिया यूनिवर्सिटी ज्वाइंट एक्शन कमेटीचा भाग असल्याचं देखील आता उघड झालं आहे.

Allu Arjun
अल्लू अर्जुन (अल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला (ANI))

अल्लू अर्जुनच्या घराबाहेर निदर्शन : अल्लू अर्जुन आणि सरकारच्या जाहीर वक्तव्यानंतर तणाव वाढला आहे. जुबली हिल्स पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उस्मानिया यूनिवर्सिटी ज्वाइंट एक्शन कमेटीनं रविवारी अल्लू अर्जुनच्या घराबाहेर निदर्शनं केली आणि फलक घेऊन देखील घोषणाबाजी केली. यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी अद्याप कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. आता याप्रकरणी जुबली हिल्स पोलिसांकडून अधिक माहितीची प्रतीक्षा आहे. अल्लू अर्जुनवर सध्या अनेक आरोप केले जात आहेत, त्यामुळे सध्या तो आता चर्चेचा विषय बनला आहे. याप्रकरणी अनेक चाहते अल्लू अर्जुनला पाठिंबा देखील सोशल मीडियाच्या माध्यामातून देत आहेत. अनेकजण आपल्या प्रतिक्रिया याप्रकरणी देत आहेत.

हेही वाचा :

  1. अल्लू अर्जुननं केली चाहत्यांना विनंती, म्हणाला- 'अपशब्द वापरू नका'
  2. 'पुष्पा 2'नं बॉक्स ऑफिसवर 'बाहुबली 2'चा मोडला रेकॉर्ड...
  3. हिंदी आवृत्तीमध्ये 600 कोटी क्लबमध्ये 'पुष्पा 2'नं केला प्रवेश...

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.