Road Romeo Slapped Belt : रोड रोमियोला छेडछाडीला कंटाळलेल्या मुलीने दिला पट्ट्याने चोप; पाहा व्हिडिओ - सेलू व्हायरल व्हिडिओ
🎬 Watch Now: Feature Video
परभणी - सतत होणाऱ्या छेडछाडीला कंटाळून एका महाविद्यालयीन युवतीने मुलाला भररस्त्यात पट्ट्याने चोप ( Road Romeo Slapped Belt ) दिल्याची घटना परभणी जिल्ह्यातील सेलु येथे ( Road Romeo Slapped in parbhani ) घडली. सेलू तालुक्यातील तळतुंबा या गावात राहणाऱ्या या मुलीची रवळगाव येथे राहणारा मुलगा दररोज छेड काढत त्रास देत होता. दोघे ही आपल्या गावाकडून महाविद्यालयात ये-जा करत होते. दरम्यान, दररोज छेड काढत असल्याने अखेर मुलीने मुलास भररस्त्यात गाठून पट्ट्याने चांगलाच चोप दिला. या घटनेचा व्हीडिओ सध्या जिल्ह्यात चांगलाच व्हायरल होत आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:11 PM IST