Yeola Market Committee Closed : येवला बाजार समिती राहणार 8 दिवस बंद.. कांदा, मका, भुसार लिलावही होणार नाहीत.. - कांदा मका भुसार लिलाव येवल्यात राहणार बंद
🎬 Watch Now: Feature Video
येवला ( नाशिक ): येवला कृषी उत्पन्न बाजार समिती पुढील आठ दिवस बंद राहणार ( Yeola Market Committee Closed ) आहे. शनिवार 26 मार्च ते गुरुवार 31 मार्चपर्यंत मार्चअखेर असल्याने व्यापाऱ्यांनी केलेल्या अर्जानुसार कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा, मका व भुसार धान्य लिलाव बंद राहणार आहेत. तसेच 1 एप्रिल रोजी अमावस्या व शनिवार 2 एप्रिल रोजी गुढीपाडवा सण असल्याने कृषी उत्पन्न बाजार समिती अशी सलग आठ दिवस बंद राहणार आहे. बाजार समिती बंद राहिल्याने शेतमाल कुठे विक्री करावा असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST