हैदराबाद : ओप्पो त्यांच्या फोल्डेबल फोनसोबत एक नवीन स्मार्टवॉच देखील लाँच करणार आहे. अलिकडेच ओप्पोनं प्रीमियम फोल्डेबल फोनच्या लाँचिंग तारखेची घोषणा केली आहे. फोनसोबतच, कंपनी या कार्यक्रमात त्यांची नवीन स्मार्टवॉच ओप्पो वॉच एक्स2 देखील लाँच करणार आहे.
ओप्पो वॉच एक्स2
ओप्पोचा नवीन ओप्पो फाइंड एन5 फोल्डेबल फोन 20 फेब्रुवारी 2025 रोजी चीनमधील स्थानिक बाजारात लाँच होणार आहे. पण हा फोल्डेबल फोन लाँचिंग इव्हेंटमध्ये एकटा लॉंच होणार नाहीय. कंपनीनं फोनसोबत त्यांची नवीन स्मार्टवॉच ओप्पो वॉच एक्स2 लाँच करण्याची पुष्टी देखील केली आहे. येणाऱ्या घड्याळात काय खास असेल, चला उघड झालेल्या तपशीलांवर एक नजर टाकूया...
ओप्पो वॉच एक्स2 चा टीझर
ओप्पो 20 फेब्रुवारी रोजी चीनमध्ये त्यांचा नवीनतम फ्लॅगशिप फोल्डेबल स्मार्टफोन लाँच करणार आहे. लॉन्चची तारीख जाहीर करताना, ओप्पोनं एका टीझर इमेज पोस्टरमध्ये घड्याळाची पहिली झलक देखील दिलीय. या टीझरमध्ये घड्याळाची डिझाइन उघड झाली आहे, ज्यामध्ये गोल डायल आणि डिस्प्ले दाखवण्यात आला आहे.
Oppo Watch X2 प्री-ऑर्डर सुरू
सध्या, Oppo Find N5 आणि Oppo Watch X2 चीनमध्ये प्री-ऑर्डरसाठी सूचीबद्ध झाले आहेत. ही स्मार्टवॉच जागतिक स्तरावर OnePlus Watch 3 Pro म्हणून लाँच केली जाऊ शकते, अशी शक्यता देखील आहे. आतापर्यंत उघड झालेल्या माहितीच्या आधारे, असं म्हणता येईल की घड्याळात टायटॅनियम बेझल असेल. टीझरमध्ये जुळणाऱ्या पट्ट्यांसह किमान तीन रंगांचे पर्याय यात दाखवले आहेत. यामध्ये चांदी, निळा आणि काळा रंगाचा प्रकार समाविष्ट आहेत.
Oppo Watch X2 फीचर
घड्याळात अनेक आरोग्यविषयक वैशिष्ट्ये उपलब्ध असतील. आगामी Oppo Watch X2 वाच हायपरटेन्शन रिस्क रिमाइंडर फंक्शन, ECG हार्ट रेट ट्रॅकिंग, तापमान मॅपिंगसह इतर अनेक आरोग्य आणि फिटनेस ट्रॅकिंग वैशिष्ट्यांसह लाँच होईल. स्मार्टवॉच 46mm आकारात OLED डिस्प्ले, eSIM सपोर्ट आणि सुमारे 648mAh बॅटरी पॅकसह 10W फास्ट चार्जिंग, GPS, NFC, 5ATM आणि IP68 रेटिंगसह येण्याची अपेक्षा आहे. याशिवाय, सध्या घड्याळाबद्दल इतर कोणतीही माहिती उघड झालेली नाही.
हे वाचलंत का :