हैदराबाद : अँड्रॉइड वापरकर्ते, आता तुम्ही तुमच्या आवडत्या अॅपल ओरिजिनल सिरीज तुमच्या डिव्हाइसवर पाहू शकता. होय! आयफोन कंपनीनं Apple TV ॲप आता अँड्रॉइड स्मार्टफोन, टॅब्लेट आणि फोल्डेबलसाठी गुगल प्ले स्टोअरवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून दिलंय. या ॲपद्वारे, अँड्रॉइड वापरकर्ते मेजर लीग सॉकरचे घर असलेल्या एमएलएस सीझन पाससह, अॅपल टीव्ही+ वर अॅपल ओरिजिनल मालिका आणि चित्रपट स्ट्रीम करू शकतात. अॅपलनं पुष्टी केली आहे की, हे अॅप 10 किंवा त्यावरील आवृत्तीवर चालणाऱ्या अँड्रॉइड डिव्हाइसेसशी सुसंगत आहे.
अँड्रॉइडसाठी अॅपल टीव्ही अॅप
अँड्रॉइडसाठी अॅपल टीव्ही अॅप जगभरात उपलब्ध आहे. अँड्रॉइड वापरकर्ते अँड्रॉइड फोन, टॅब्लेट आणि गुगल टीव्ही डिव्हाइसेसवर त्यांच्या गुगल प्ले खात्याचा वापर करून अॅपल टीव्ही+ आणि एमएलएस सीझन पासची सदस्यता घेऊ शकतात. Apple TV+ मध्ये सात दिवसांची मोफत सदस्यता देखील तुम्हाला मिळेल. iCloud खाते असलेले वापरकर्ते Android डिव्हाइसवर त्यांच्या iCloud आयडी वापरून लॉग इन करू शकतात. हे लक्षात घेणं महत्त्वाचे आहे की Apple TV ॲप आधीच Android TV वर उपलब्ध आहे.
अॅपमध्ये वॉचलिस्ट वैशिष्ट्ये
अँड्रॉइडवरील अॅपल टीव्ही अॅपमध्ये वॉचलिस्ट सारखी प्रमुख वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत. याचा वापर करून तुम्हाला काय बघायचं त्याची यादी ठेवता येणार आहे. हे ॲप वाय-फाय किंवा सेल्युलर कनेक्शनद्वारे स्ट्रीम होतं. "अँड्रॉइडवरील अॅपल टीव्ही ॲपसह, अँड्रॉइड वापरकर्ते आता अॅपल टीव्ही+ चे सदस्यत्व घेऊ शकतात. यात नाटक आणि विनोदी मालिका, चित्रपट, माहितीपट आणि मुलांसाठी आणि कुटुंबासाठी मनोरंजनाचे कार्यक्रमत असतील. यात तुम्हाला सेव्हरन्स, स्लो हॉर्सेस, द मॉर्निंग शो, प्रिझ्युम्ड इनोसंट, श्रिन्किंग, हायजॅक, लूट, पाम रॉयल, मास्टर्स ऑफ द एअर आणि टेड लासो सारख्या मालिका पाहता येतील. सदस्यांना वुल्फ्स, द इन्स्टिगेटर्स, द फॅमिली प्लॅन, किलर्स ऑफ द फ्लॉवर मून, सीओडीए अशा बऱ्याच अॅपलच्या ओरिजिनल चित्रपटांमध्ये प्रवेश मिळवता येईल," असं कंपनीनं म्हटलं आहे.
गुगल प्ले स्टोअर वरून ॲपल टीव्ही ॲप कसं डाउनलोड करावं
- तुमच्या अँड्रॉइड फोन किंवा टॅबलेटवर गुगल प्ले स्टोअर उघडा.
- सर्च बारमध्ये Apple TV शोधा.
- शोध निकालांमधून Apple TV ॲपवर टॅप करा.
- ॲप डाउनलोड आणि इंस्टॉल करण्यासाठी इंस्टॉल दाबा.
- अॅप उघडा, तुमच्या अॅपल आयडी किंवा गुगल प्ले खात्यानं साइन इन करा आणि स्ट्रीमिंग सुरू करा.
हे वाचलंत का :