ETV Bharat / technology

सॅमसंगचा भारतात सर्वात परवडणारा Galaxy F06 5G स्मार्टफोन लॉंच - GALAXY F06 5G LAUNCH

दक्षिण कोरियाची टेक कंपनी सॅमसंगनं भारतीय बाजारात सर्वात परवडणारा Galaxy F06 5G स्मार्टफोन लॉंच केलाय. कंपनी या फोनला 4 वर्षांसाठी सॉफ्टवेअर अपडेट देतेय.

Galaxy F06 5G
Galaxy F06 5G (Samsung)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Feb 13, 2025, 10:08 AM IST

हैदराबाद : सॅमसंगनं बजेट सेगमेंटमध्ये आपला नवीन F-सीरीज स्मार्टफोन Galaxy F06 5G सादर केला आहे. कंपनीनं हा फोन सर्वात परवडणारा 5G फोन म्हणून आणला आहे. त्याला चार वर्षांसाठी Android OS अपडेट दिले जातील. मजबूत कामगिरीसाठी, या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 6300 प्रोसेसर देण्यात आला आहे.

फोन दोन रंगात उपलब्ध
सॅमसंगनं आपल्या नवीन फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे आणि त्यात 50MP चा प्राथमिक कॅमेरा आहे. भारतात, Galaxy F06 5G कंपनीच्या अधिकृत वेबसाइट तसंच ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवरून खरेदी करता येईल. ग्राहकांना ऑफलाइन बाजारात खरेदी करण्याचा पर्याय देखील दिला जाईल, हे नवीन डिव्हाइस बहामा ब्लू आणि लिट व्हायलेट या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये लाँच करण्यात आलं आहे.

Galaxy F06 5G स्पेसिफिकेशन
Galaxy F06 5G मध्ये 6.7-इंचाचा HD+ रिझोल्यूशन डिस्प्ले आहे, ज्याची पीक ब्राइटनेस 800nits आहे. दमदार कामगिरीसाठी, त्यात MediaTek Dimensity 6300 प्रोसेसर आणि 6GB पर्यंत RAM सह 128GB पर्यंत स्टोरेज आहे. Samsung च्या मते, या फोनला AnTuTu बेंचमार्क प्लॅटफॉर्मवर 416,000 पॉइंट्स मिळाले आहेत. या फोनला Android 15 वर आधारित OneUI 7.0 देण्यात आले आहे. फोनला चार वर्षांसाठी सॉफ्टवेअर अपडेट्स दिले जातील.

50MP प्राथमिक कॅमेरा
कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचं झालं तर, डिव्हाइसच्या मागील पॅनलवर 50MP प्राथमिक कॅमेरा व्यतिरिक्त, 2MP डेप्थ सेन्सर उपलब्ध आहे. त्याच वेळी, Galaxy F06 5G मध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8MP फ्रंट कॅमेरा आहे. यात 25W फास्ट चार्जिंगसह 5000mAh बॅटरी आहे. हे डिव्हाइस डझनभर 5G बँडना सपोर्ट करतं.

Galaxy F06 5.G ची किंमत

नवीन सॅमसंग स्मार्टफोन दोन रॅम आणि स्टोरेज व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. 4 जीबी रॅमसह पहिल्या 128 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 10,999 रुपये आणि 6 जीबी रॅमसह दुसऱ्या 128 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 11,499 रुपये ठेवण्यात आली आहे. तथापि, या दोन्ही व्हेरिएंटवर 500 रुपयांच्या बँक कॅशबॅकचा फायदा दिला जात आहे.

हे वाचलंत का :

  1. Google Pixel 9A 19 मार्च रोजी लाँच होऊ शकतो, जागतिक बाजारपेठेत 26 मार्चपासून विक्री सुरू
  2. मुंबईत प्रथम व्होडाफोन आयडियाची 5G सेवा, मुंबईनंतर, बेंगळुरू, चंदीगड, दिल्ली, पटनात सेवेचा विस्तार
  3. सॅमसंगच्या नवीन स्मार्टफोनमध्ये 7000mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग सपोर्ट?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.