We Stand With Nawab Malik : नवाब मलिक यांच्या पाठीशी मजबुतीने उभे राहणार - मंत्री छगन भुजबळ - Minister Ashok Chavan

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Feb 26, 2022, 7:14 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST

येवला ( नाशिक ) - नवाब मलिक ( Nawab Malik ) यांच्यावर अन्याय होत आहे, याला वाचा फोडण्यासाठी महाविकास आघाडीच्या सर्व नेते मलिक यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे, असे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ ( Minister Chhagan Bhujbal ) म्हणाले. नवाब मलिक यांच्यावर ईडीकडून करण्यात आलेल्या कारवाईच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात आले. यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सक्रिय सहभाग नव्हता, असा प्रश्न भुजबळ यांना माध्यम प्रतिनिधींनी विचारला असता ते म्हणाले, मंत्री आदित्य ठाकरे व खासदार संजय राऊत हे उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. तसेच कोकणात भराडीदेवीचे जत्रा सुरू असल्याने मुळचे कोकणचे असलेले नगरसेवक, आमदार, खासदार व मंत्री त्या ठिकाणी आहेत. पण, मंत्री सुभाष देसाई ( Minister Subhash Desai ) , शिवसेना महिला आघाडीचे सदस्य मोठ्या संख्येने आंदोलनात उपस्थित होते. नवाब मलिक यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ), शरद पवार ( Sharad Pawar ), मंत्री बाळासाहेब थोरात ( Minsiter Balasaheb Thorat ), मंत्री अशोक चव्हाण ( Minister Ashok Chavan ) आम्ही सर्वांनी मिळून घेतला आहे, असे ते म्हणाले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.