Two drown in Kusgaon Dam - मावळातील कुसगाव धरणात बुडून दोघांचा मृत्यू - कुसगाव धरण
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - मावळमधील कुसगाव धरणात पाण्याचा ( Two drown in Kusgaon Dam ) अंदाज न आल्याने दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला आहे. ते इतर सहा मित्रांसह कुसगाव धरण परिसरात फिरण्यासाठी आले होते. अरिष गोगी आणि विनय कडू, अशी दोघांची नावे आहेत. अरिष आणि विनय मित्रांसोबत पाण्यात उतरले. पण, त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही त्यामुळे ते बुडाले. त्यांना वाचवण्याचा मित्रांनी प्रयत्न केला. पण, त्यांना यश आले नाही. ही घटना आज (दि. 21 मार्च) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे, अशी माहिती शिरगाव पोलिसांनी दिली आहे. दोघांचा मृतदेह धरणातून बाहेर काढण्यात आला असून शवविच्छेदनसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST