Ambabai Temple Kolhapur : अंबाबाई मंदिरात भाविकांचे पाकीट मारणाऱ्या महिलेला पकडले, पाहा व्हिडिओ - Ambabai Temple Kolhapur
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापूर - कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर ( Ambabai Temple Kolhapur ) परिसरात भाविकांचे पाकीट, पर्स आदी वस्तू चोरीला जात असल्याच्या घटना नवीन नाहीत. असेच एका पुण्यातील भाविकाचे पाकीट मारल्यानंतर अंबाबाई मंदिरातल्या सीसीटीव्हीमध्ये तपासले असता एक महिला चोर चोरी करताना यामध्ये कैद झाल्याचे ( Woman caught stealing at Ambabai temple ) आढळले. त्यानुसार परिसरात संबंधित महिलेचा शोध घेऊन तपासणी केली असता तिच्या पर्समध्ये काही रोख रक्कम, सोन्याच्या अंगठी तसेच काही वस्तू आढळल्या. सविता गोविंद आवताडे (रा. आष्टा कासर, ता. लोहरा, जि. उस्मानाबाद) असे या महिलेचे नाव असून संबंधित महिलेविरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.