सांगलीत अवकाळी पावसाची धुंवाधार बॅटिंग, विजांच्या कडकडाटासह गाराही बरसल्या - विजांच्या कडकडाटासह गारांचा मुसळधार पाऊस
🎬 Watch Now: Feature Video
सांगली - शहरासह जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी ( Unseasonal Rain in Sangli ) लावली. सांगली आणि मिरज शहरासह परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह गारांचा मुसळधार पाऊस पडला आहे. तसेच विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस पडला आहे. सकाळपासून सांगली-मिरज शहर परिसरात उन्हाचा कडाका वाढला होता. त्यामुळे सांगलीकर उकाड्याने हैराण झाले होते आणि या अवकाळी पावसामुळे सांगलीकरांना उकड्यापासून दिलासा मिळाला आहे. सुमारे अर्धा तास मुसळधार पाऊस सांगली शहरासह पडला आहे. सांगली व मिरज शहराच्या अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गाराही पडल्या. तर अचानक झालेल्या अवकाळी पावसाने सांगलीकरांची मोठी दैना उडाली. शनिवारी भरणाऱ्या बाजारातील विक्रेत्यांची मोठी तारांबळ उडाली. पावसामुळे त्यांच्या व्यवसायाला फटका बसला. पावसामुळे शहरातील अनेक सखल भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. तसेच अवकाळी पावसामुळे द्राक्ष शेती अन् फळबागांचे मोठे नुकसान झाले.