Video : वाहतूक पोलिसांनी दुचाकीसह वाहन चालकालाही उचलले, व्हिडीओ वायरल - नागपूर नो पार्किंग
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर : नागपूर शहरातील सदर भागातील अंजुमन कॉम्प्लेक्सजवळ नो पार्किंगच्या ( No Parking In Nagpur ) जागी एकाने दुचाकी लावली होती. नो पार्किंगमधले उभे असलेले वाहन उचण्यासाठी वाहतूक शाखेची ( Nagpur Traffic Police ) हायड्रोलिक क्रेन त्याठिकाणी दाखल होताच, वाहनचालक दुचाकीवर जाऊन बसला. त्याने वाहन घेऊन जाण्यास विरोध दर्शविला. तेव्हा वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांनी चक्क क्रेनच्या मदतीने त्या दुचाकीस्वाराला त्याच्या वाहनासह ( Traffic Police Picked Vehicle With Driver ) उचलले. हा दुचाकीस्वार काही वेळ हवेत झुलत होता. ही घटना अनेकांनी आपल्या मोबाईल मध्ये रेकॉर्ड केली असून, आता तो व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान वायरल होतं ( Nagpur Viral Video ) आहे. हा व्हिडिओ वायरल झाल्यानंतर या प्रकरणाच्या तपासाचे आदेश वाहतूक शाखेकडून देण्यात आले आहेत.