हल्दवानी : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा महाराष्ट्रानं गाजवली. यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रानं सर्वाधिक पदकांची कमाई करत स्पर्धेतील दुसरं स्थान गाठलं. परंतु, सेवा क्रीडा नियंत्रण मंडळाच्या संघानं स्पर्धेत सर्वाधिक ६८ सुवर्ण पदाकांची कमाई करत स्पर्धेतील अव्वल स्थान पटकावलं आहे. याबाबतीत महाराष्ट्र ५४ सुवर्ण पदकांसह दुसऱ्या स्थानावर राहिला आहे.
पहिल्याचं झळकावलं पदकांच शतक : उत्तराखंडमध्ये २८ जानेवारी ते १४ फेब्रुवारी दरम्यान विविध ठिकाणी विविध स्पर्धा झाल्या. स्पर्धेत यजमान राज्य उत्तराखंडने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच त्यांनी १०० हून अधिक पदके जिंकली. गेल्या वर्षी गोवा इथं झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत उत्तराखंडला फक्त २४ पदकांची कमाई केली होती. यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत उत्तराखंडने जबरदस्त कामगिरी करत १०३ पदके पटकावली.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या पदकतालिकेवर एक नजर : ३८ व्या राष्ट्रीय खेळांच्या पदकतालिकेत सेवा क्रीडा नियंत्रण मंडळ पहिल्या क्रमांकावर आहे. त्यांनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ६८ सुवर्ण, २६ रौप्य आणि २७ कांस्य पदक अशी एकून १२१ पदके जिंकली. याबाबतीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. स्पर्धेत महाराष्ट्रने ५४ सुवर्ण, ७१ रौप्य आणि ७६ कांस्य पदके जिंकत २०१ पदकांची कमाई केली. स्पर्धेत १५३ पदकांसह हरियाणा पदतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. त्यांनी ४८ सुवर्ण, ४७ रौप्य आणि ५८ कांस्य पदके अशी एकूण १५३ पदे पटकावली. समारोप समारंभात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील विजेत्या आणि उपविजेत्या संघांचा सन्मान केला.
अशी कामगिरी करणारं महाराष्ट्र एकमेव राज्य : महाराष्ट्रने सलग दुसर्यांदा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदकांचं द्विशतक पूर्ण केलं. अशी कामगिरी करणारं महाराष्ट्र एकमेव राज्य आहे. स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी मल्लाखांब खेळाडू यशने पदकाची कमाई करत महाराष्ट्राचं द्विशतक पूर्ण करत स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली.
महाराष्ट्राची ऐतिहासिक कामगिरी : उत्तराखंडमध्ये झालेल्या ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रानं ५४ सुवर्ण पदकांसह ७१ रौप्य, ७६ कांस्य पदकांची कमाई करत पदकतक्यात दुसरं स्थान पटकावलं. गेल्यावर्षी झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्रानं अशीच पदकांची लयलूट करत २२८ पदकांची कमाई केली होती. यंदाच्याही राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत २०० हून अधिक पदकांची कमाई करत महाराष्ट्रानं ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
मल्लखांबमध्ये पदकांची लयलूट : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या १७ व्या दिवशी रात्री मल्लखांब या क्रीडा स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला नव्हता. स्पर्धा समितीनं आज (दि.१४) सकाळी मल्लखांब स्पर्धेचा निकाल जाहीर केला. यात महाराष्ट्रानं मल्लखांबमध्ये ३ कांस्यपदांची कमाई करत द्विशतक पूर्ण केलं यात रिषभ घुबडे, शार्दूल हृषिकेश आणि दर्शन मिनियार यांनी पदके जिंकली. त्याधी अखेरचं सुवर्णपदक रुपाली गंगावणेनं पटकावलं. मल्लखांबा क्रीडा प्रकारात शार्दूलने पदकांचा चौकार लगावला. त्याच्यासह सोहेल शेख, आदित्य पाटील आणि मृगांक पाठारे यांनीही पदकांची कमाई केली. मल्लखांब क्रीडा प्रकारात महाराष्ट्रानं 4 सुवर्ण, 4 रौप्य आणि 5 कांस्यपदके पटकावली.
सर्व क्रीडा प्रकारात महाराष्ट्रानं पटकावली पदकं : ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रानं सर्व २७ क्रीडा प्रकारात पदकांची लयलूट केली. यात महाराष्ट्रनं जिम्नॉस्टिक्स क्रीडा प्रकारात सर्वाधिक 12 सुवर्ण पदकांसह 24 पदकं पटकावली.
मेघालयला मिळाले ३९ व्या राष्ट्रीय खेळांचे यजमानपद : उत्तराखंडमधील ३८ व्या राष्ट्रीय खेळांच्या समारोप समारंभात ३९ व्या राष्ट्रीय खेळांची सूत्रे सुपूर्द करण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ३९ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासाठी मेघालयाचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांना खेळांचा ध्वज सुपूर्द केला. ३९ व्या राष्ट्रीय खेळांचे सर्व कार्यक्रम फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये मेघालय इथं होणार आहेत.
हेही वाचा :