building collapsed : बघता बघता कोसळली तीन मजली इमारत; हा बघा व्हिडिओ - चंद्रपूर शहर
🎬 Watch Now: Feature Video
चंद्रपूर शहरामध्ये एक तीन मजली इमारत कोसळल्याने, मोठी दुर्घटना घडली. ही इमारत कोसळतानाचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झालेला आहे. अंगावर शहारे येणारा असा हा व्हिडिओ आहे. घुटकाळा वार्डातील जिर्ण अवस्थेत असलेली इमारत कोसळल्याची घटना आज दुपारी दिड वाजताच्या सुमारास घडली. घुटकाळा वार्डात पटेल नामक तिन मजली ईमारत आहे. सदर इमारतीचे बांधकाम 70 वर्षे जुने असल्याने इमारत जिर्ण झाली होती. या इमारतीत शेख कुटुंबीय वास्तव्यास होते. या घटनेत शाहिस्ता खान नामक महिला इमारतीच्या मलब्याखाली दबल्या गेली. यावेळी महिलेला बाहेर काढण्याचे प्रयत्न प्रशासनाच्या वतीने सुरु होते. काही वेळात महिलेला सुखरुप बाहेर काढण्यात आले. ही इमाइत कोसळतानाचा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे.