ETV Bharat / state

लॉजमधून चार बांगलादेशी नागरिकांना घेतलं ताब्यात; अवैधपणे करत होते वास्तव्य - DHULE CRIME NEWS

शहरातील एका लॉजमधून चार बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आलं आहे.

Police Custody
बांगलादेशी नागरिकांना एसीबीने घेतले ताब्यात (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 23, 2024, 10:28 PM IST

धुळे : धुळे शहरातील एका लॉजमध्ये अवैधपणे वास्तव्य करणाऱ्या चार बांगलादेशी नागरिकांना धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ताब्यात घेतलं आहे. धुळे (Dhule Crime Branch) स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली. पथकाला मिळालेल्या माहितीनुसार, एका लॉजवर छापा टाकला असता तिथे चौघे बांगलादेशी नागरिक (Bangladeshi People) आढळून आले, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. पुढील चौकशी पर्यंत चौघांना ताब्यात ठेवण्यात येईल. तसंच त्यांच्या संपर्कातील नागरिकांची चौकशी करण्यात येईल अशी माहिती, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांनी दिली आहे.

लॉजमधील छाप्यात चौघे ताब्यात : धुळे पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी न्यू शेरेपंजाब लॉजमध्ये छापा टाकला. यावेळी लॉजमधील रूम नं. 122 मध्ये बेकायदेशीररित्या राहणाऱ्या संशयितांची माहिती मिळाली होती. त्यांनी ही माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांना दिली. त्यांनी घटनेचं गांभीर्य ओळखून तातडीनं कारवाईचे आदेश दिले. पथकानं लॉजवर छापा टाकला असता, लॉजमध्ये चार बांगलादेशी नागरिक सापडले. महंमद मेहताब विलाल शेख (48 वर्षे), शिल्पी बेगम महंमद बेताब शेख (43 वर्षे), ब्युटी बेगम पोलस शेख (45 वर्षे), रिपा रफीक शेख (30 वर्षे) अशी त्यांची नावं आहेत.

प्रतिक्रिया देताना श्रीकांत धिवरे (ETV Bharat Reporter)

बेकायदेशीर मार्गाने भारतात प्रवेश : तपासादरम्यान त्यांनी बेरोजगारीला कंटाळून कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय बेकायदेशीर मार्गाने भारतात प्रवेश केल्याची कबुली दिली. ते धुळे शहरात घर शोधून कायम राहण्याचा प्रयत्न करत असल्याचं समोर आलं. त्यांच्याकडं कोणतेही वैध पासपोर्ट अथवा व्हिसा आढळला नाही. त्यांच्याकडून चार मोबाईल जप्त करण्यात आले असून, ते बांगलादेशातील नातेवाईकांशी संपर्क साधण्यासाठी आयएमओ ॲपचा वापर करत असल्याचं निष्पन्न झालं आहे. चौघाही बांगलादेशी नागरिकांविरोधात आझाद नगर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या पथकानं केली कारवाई : सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकानं केली. या पथकात सपोनि श्रीकृष्ण पारधी, पोउनि प्रकाश पाटील आणि इतर कर्मचाऱ्यांचा समावेश होता. तसंच, दहशतवाद विरोधी पथक, दामिनी पथक आणि आझाद नगर पोलीस ठाण्याचे अधिकारी यांनीही या कामगिरीत मोलाचं सहकार्य केलं. पोलिसांच्या या कारवाईमुळं धुळे शहरात अवैध घुसखोरीला आळा घालण्याच्या दिशेनं मोठे पाऊल उचललं गेलं आहे.

हेही वाचा -

  1. बेकायदा वास्तव्यास असणाऱ्या बांगलादेशी जोडप्याला अटक
  2. भारतात घुसखोरी केलेल्या तीन बांगलादेशी नागरिकांना पाच वर्षांची शिक्षा, एनआयए विशेष न्यायालयाचा निकाल
  3. बांगलादेशी पॉर्नस्टार अटकेत ; बनावट कागदपत्रावर राहत होती उल्हासनगरात, कुटुंबाचा समावेश असल्याचा संशय - Bangladeshi Porn Star Arrested

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.