Kirit Somaiya on Sanjay Raut : संजय राऊत - किरीट सोमैया यांच्यात कलगीतुरा; पाहा व्हिडिओ - संजय राऊत यांची किरीट सोमैया यांच्यावर टीका
🎬 Watch Now: Feature Video
मुंबईतील खार परिसरात किरीट सोमैया ( Sanjay Raut on kirit somaiya ) यांना मारहाण झाल्याप्रकरणी सोमैया यांच्यासह भाजपचे शिष्टमंडळ आज केंद्रीय गृहसचिव यांना भेटण्यासाठी दिल्लीला रवाना झाले आहे. यावर आता शिवसेना नेते व खासदार संजय राऊत ( Sanjay Raut about president rule in Maharashtra ) यांनी प्रतिक्रिया दिली असून, राष्ट्रपती राजवट लावायची असेल तर उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात एकाच वेळी लावा, असे राऊत ( Sanjay Raut news on kirit Somaiya in Mumbai ) यांनी म्हटले आहे. ते मुंबईत आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते. तर भाजप नेते किरीट सोमैया यांनी दिल्लीत गृहसचिवांची भेट घेतली. 20 ते 25 मिनीट ही भेट झाली. यामध्ये राज्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावर आम्ही चर्चा केली. ( Kirit Somaiya Met The Home Secretary ) त्यावर गृहसचिवांनी चिंता व्यक्त केली अशी माहिती सोमैया यांनी दिली आहे. यावर आम्हाला जे आवश्यक वाटेल ती कारवाई आम्ही करणार आहोत अशी ग्वाही गृहसचिवांनी आम्हाला दिली अशी माहितीही सोमैया यांनी दिली आहे.