Kirit Somaiya On Sanjay Raut : सोमय्यांचा राऊतांवर घणाघात! 'संजय राऊतांना हिशोब द्यावा लागेल' - संजय राऊतांना हिशोब द्यावा लागेल
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरावर ईडीने कारवाईला सुरुवात ( ED Raid at Sanjay Raut House ) केली. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी माफीया संजय राऊत यांना हिशोब तर द्यावा लागेल, अशा शब्दांत राऊतांवर घणाघात केला ( Kirit Somaiya criticized Sanjay Raut ) . ईडीचे अधिकारी कायद्याचे पालन करत आहेत. संजय राऊत यांना हिशोब तर द्यावा लागेल( Sanjay Raut have to pay ). बाराशे कोटीचा पत्राचाळ घोटाळा असू दे किंवा वसई नायगाव येथील पीएसएनएल येथील बिल्डरचा घोटाळा असो, माफियागिरी असो, दादागिरी असो प्रत्येकाला जेलमध्ये पाठवायची धमकी देणाऱ्यांना हिशोब द्यावा लागेल. महाविकास आघाडीचा महाराष्ट्र लुटण्याचा जो प्रयत्न सुरू होता. आता सगळ्याचा हिशोब तर संजय राऊत यांना द्यावाच लागेल. संजय राऊतांवरील कारवाईमुळे महाराष्ट्रातील जनतेला आनंद झाल्याचे सोमय्यांना म्हणाले.