Ketki Chitale Post Controversy : केतकीचे समर्थन करणारी कीड ठेचून काढली पाहिजे - रुपाली चाकणकर - महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर
🎬 Watch Now: Feature Video

नाशिक - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साहेबांकडे महाराष्ट्र गुरुतुल्य व्यक्तीमत्व म्हणून बघतो. पण समाजामध्ये काही विकृती आहेत. त्यांच्याबद्दल असे वक्तव्य करणारी ही किड असून ती ठेचून काढली पाहिजे. केतकी चितळेला ( Ketki Chitale post Controversy ) समर्थन देणारीही किडच एक सारखी विचारांची आहे, अशा शब्दात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर ( State Women Commission Chairperson Rupali Chakankar ) यांनी केतकी चितळे व तिचे सर्मथन करणार्या भाजपा नेत्यांवर घणाघात केला. केतकीच्या पोस्टनंतर महिला आयोगाकडे मेलद्वारे अनेक तक्रारी झाल्या आहेत. ज्या विभागातून तक्रारी आल्या तिथल्या पोलिसांना महिला आयोगाकडून कारवाई बाबत निर्देश दिले आहेत. पोलीस व्यवस्थित काम करत असून त्यांना कोणाच्या सल्ल्याची गरज नाही, असा टोला त्यांनी भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांना लगावला.
Last Updated : May 16, 2022, 3:55 PM IST