येवला शहरात चोरट्यांचा सुळसुळाट.. तीन ठिकाणी चोऱ्या - येवला दुकान चोरी
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-15730137-thumbnail-3x2-op.jpg)
येवला (नाशिक) - येवला शहरात मोठ्या प्रमाणात चोरीचे सत्र सुरू असल्याने पोलिसांपुढे मोठे आव्हान ठाकले आहे. सलग दोन दिवसांत तीन ठिकानी चोरी झाली असल्याने नागरिक देखील धास्तावले आहेत. साईदत्त फार्मामध्ये चोरी झाली असून चोर चोरी करताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाले. तर दुसऱ्या ठिकाणी पटणी गल्लीत शशिकांत अंकाईकर यांच्या घराचे कुलूप तोडत कपाटातील सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. शहरात रविवार रात्री तिसऱ्या ठिकाणी गुजरवाडा परिसरात पुरुषोत्तम विश्वमभर कासार हे त्याच्या मुलाला भेटण्यासाठी नगर येथे गेले होते. त्यांच्या घराला कुलूप पाहून चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश करीत घरातील सर्व सामान अस्तव्यस्त करीत जे सापडेल ते घेऊन गेले. तसेच साळी गल्ली येथील भालेराव यांची दुचाकी गाडी व घरातील रोख रक्कम घेऊन पसार झाले. सततच्या होणाऱ्या चोऱ्यांमुळे शहरातील नागरिक भयभीत झाले आहेत.