Video : ...तर मातोश्रीवर पुन्हा जाऊ,... बंडखोर आमदार संजय राठोड यांच्या विधानाने खळबळ - Matoshri
🎬 Watch Now: Feature Video

यवतमाळ - 'शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) हेच आमचे नेते राहतील, त्यांच्याबाबत नेहमीच आदर राहील, आणि मातोश्रीचे दरवाजे जेव्हा उघडे होतील. त्यावेळी उध्दवजीसोबत जाऊ ही भूमिका ठेऊनच उठाव केला' असल्याचे शिवसेना बंडखोर आमदार संजय राठोड ( Rebel MLA Sanjay Rathod ) यांनी सांगितले आहे. राठोड हे राज्यात सत्तांतरण झाल्यानंतर आज त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात पोहोचले. यावेळी त्यांचे स्वागतासाठी समर्थकांनी गर्दी केली. यावेळी माध्यमांशी बोलताना राठोड यांनी शिवसैनिकांशी भांडण नसल्याचे सांगितले, .आम्ही अचानक उठाव केल्याने जिल्ह्यातील शिवसैनिकांनी आपल्या विरोधात भूमिका घेतली मात्र आता गावागावात जाऊन शिवसैनिकांना भूमिका समजावून सांगू व पुढे खांद्याला खांदा लाऊन काम करू, माझ्या कार्यालयात उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांचे असलेले फोटो कधीही काढणार नसल्याचे देखील संजय राठोड यांनी स्पष्ट केले. या कालावधीत ज्यांनी आपल्यावर गंभीर आरोप केले त्यांना देखील योग्य वेळी उत्तर देऊ असे राठोड यांनी सांगितले.