Dasara Melava 2022 तलवारीचे पूजन करून एकनाथ शिंदे भाषणाची सुरुवात करणार - दसरा मेळावा
🎬 Watch Now: Feature Video
शिवसेना उभी फूट पडल्यानंतर शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन मेळावे Dasara Melava 2022 होत आहेत. शिंदे गटाचा दसरा मेळावा Dasara Melava of Shinde group मुंबईच्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येतील मैदानावर होत असून उद्धव ठाकरे गटाचा मेळावा हा दादरच्या शिवतीर्थावर होणार आहे. एकंदरीत कशी आहे शिंदे गटाची दसरा मेळाव्याची तयारी याचा आढावा Preparations complete for Dasara Melava घेतला. एकनाथ शिंदे ज्या मंचावरून भाषण करणार आहेत. त्या मंचासमोर एक मोठी तलवार ठेवण्यात आली आहे. या तलवारीचे पूजन करून एकनाथ शिंदे आपल्या भाषणाची सुरुवात करतील. त्यामुळे या तलवारीची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. हा दसरा मेळावा म्हणजे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचं शक्ती प्रदर्शन असणार असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे बीकेसीच्या मैदानात साधारण तीन लाखाहून अधिक खुर्च्या ठेवण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून तालुक्यातून गावागावातून लोक येतील अशा प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. त्यामुळे शिंदे गटाने तीन लाख खुर्च्यांची तयारी केली असली तरी नेमकी किती लोक येतात हे पाहणं महत्त्वाचं Dasara Melava of Shinde group in BKC Mumbai आहे.