शेतमजूर ते बागाईतदार शेतकरी, वाचा स्वतः ३५ फूट विहिर खोदणाऱ्या भागिरथाची कहाणी - विशेष
🎬 Watch Now: Feature Video

नांदेड - जिल्ह्यात गेल्या चार वर्षांपासून दुष्काळ शेतकऱ्याच्या पाचवीला पुजलेला आहे. अनेक शेतकऱ्यांनी नापिकी व कर्जबाजारीपणामुळे स्वतःचे जीवन संपविले आहे. परंतु, अर्धापूर तालुक्यातील चेनापूर गावच्या शेतकरी दाम्पत्य दुष्काळाला पुरुन उरले आहे. किशन मार्कंड असे या शेतकऱ्याचे नाव असून सालगडी ते बागायतदार शेतकरी असा त्यांचा प्रवास आहे. त्यांनी कुटुंबीयांच्या मदतीने ३५ फूट विहीर खोदून दुष्काळाशी दोन हात केले.
Last Updated : Jun 26, 2019, 12:44 PM IST