Video : आर्यन खानला का मिळाली क्लीन चिट, एनसीबी अधिकाऱ्यांनी केला खुलासा, म्हणाले, व्हॉट्सअप चॅट... - NCB Clean Chit To Aryan Khan
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीने (NCB) कॉर्डिलिया क्रुझ ड्रग्ज प्रकरणात क्लीन चिट ( NCB Clean Chit To Aryan Khan ) दिली आहे. एनसीबीने आर्यन खानसह ६ जणांची नावे आरोपपत्रातून वगळली आहेत. तसेच या प्रकरणी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी एनसीबीचे प्रमुख एसएन प्रधान यांनी आर्यन खानला क्लीन चिट का दिली या प्रश्नाचे उत्तर दिले. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी व्हॉट्सअप चॅटचा उल्लेख करत केवळ व्हॉट्सअप चॅटवरून सबळ पुरावे गोळा करता आले नाहीत, असे त्यांनी यावेळी सांगितले. या प्रकरणाशी संबंधित सर्वांची चौकशी करून त्यांच्याकडून पुरावे गोळा केले जातील. या प्रकरणात आंतरराष्ट्रीय षडयंत्राची बाब सिद्ध होऊ शकलेली नाही. एनसीबी केवळ व्हॉट्सअप चॅटच्या आधारे सबळ पुरावे गोळा करू शकली नाही,” असेही एनसीबीने सांगितले.