MP Navneet Rana : खासदार राणा यांनी देवेंद्र फडणवीस अन् नारायण राणे यांच्याकडे केली मदतीची मागणी, म्हणाल्या... - हनुमान चालीसा
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-15098298-1080-15098298-1650726133382.jpg)
मुंबई - हनुमान चालीसावरून सुरू झालेल्या वादंगावरून शनिवारी (दि. 23 एप्रिल) खार पोलिसांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना ( Navneet Rana Arrest By Mumbai Police ) अटक केली आहे. चिथावणीखोर वक्तव्य आणि सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी ही अटकेची कारवाई केली आहे. यावेळी नवनीत राणा यांची पोलिसांशी ( Navneet Rana Argument With Mumbai Police ) बाचाबाची झाली. तसेच वारंट दाखवल्याशिवाय आम्ही सोबत येणार नाही, अशी भूमिका नवनीत राणा यांनी घेतली होती. दरम्यान, त्यांनी एक व्हिडिओ तयार केला आहे. त्या म्हणाल्या, पोलीस आम्हाला पोलीस ठाण्याला नेत आहेत. पण, आम्ही नोटीशीनंतर घराबाहेर पाऊल ठेवले नाही. तरीही आमच्यावर गुन्हा दाखल करत आम्हाला पोलीस ठाण्यात नेत आहेत. देवेंद्र फडणवीस व नारायण राणे यांना मदतीसाठी हाक देत खासदार राणा म्हणाल्या, तुमच्या सारखे लोक असताना आमच्या सारख्या लोकप्रतिनिधींवर अशाप्रकारे अन्याय होत आहे. आम्ही आमदार, खासदार असताना आम्हाला न्याय भेटत नसेल तर भविष्यात न्यायासाठी कोणीही राहणार नाही.