Theft Caught In CCTV : कोल्हापूरात कारसमोर नोटा टाकत मोबाईल, बॅग लांबवली.. सीसीटीव्हीत चोरी कैद - मग मोबाईलची कोल्हापुरात चोरी

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Apr 19, 2022, 3:52 PM IST

Updated : Apr 19, 2022, 4:26 PM IST

कोल्हापूर : चोरीच्या आजपर्यंत अनेक घटना आपण ऐकल्या आणि पहिल्या सुद्धा असतील पण कोल्हापूरात चोरीचा एक नवा फंडा पाहायला मिळाला असून, त्याचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले ( Kolhapur Theft Caught In CCTV ) आहे. येथील रेल्वे फाटक परिसरात एका वृद्ध व्यक्तीने रस्त्यावर कार थांबवली होती. याचीच रेकी करून जवळपास 5 ते 6 चोरट्यांच्या टोळक्याने चोरीची अनोखी पद्धत वापरून त्याच्या कारमधील बॅग आणि मोबाईल लांबवला ( Bag Mobile Theft Kolhapur ) . कारसमोर काही नोटा फेकून कारमधील व्यक्तीला आपले पैसे पडले आहेत, असे सांगत त्यांना कारमधून पडायला भाग पाडले. एव्हढ्यातच चोरट्यांचा टोळक्यातील इतरांनी कारच्या दुसऱ्या बाजूने जाऊन कारमधील मोबाईल आणि बॅग लांबवली. याबाबत शाहूपुरी पोलीस ( Shahupuri Police Station ) चोरट्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, सोमवारी भरदिवसा लोकवस्तीच्या ठिकाणी झालेल्या या घटनेनंतर चोरट्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
Last Updated : Apr 19, 2022, 4:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.