VIDEO : ...तर राणा दाम्पत्य मातोश्रीवर वाचणार हनुमान चालीसा - ravi rana hanuman chalisa
🎬 Watch Now: Feature Video
अमरावती - हनुमान जयंतीनिमित्त (Hanuman Jayanti) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा विसर पडला आहे. त्यामुळे त्यांनी मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण (Hanuman Chalisa) आयोजित करावे, असे आवाहन आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी केले आहे. हनुमान जयंतीला मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण झाले नाही तर हनुमान जयंतीनंतर मी आणि खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) दोघेही मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करणार, असे आमदार रवी राणा यांनी बडनेरा येथे सांगितले आहे. हनुमान जयंतीच्या पर्वावर अमरावती शहरातील प्रत्येक हनुमान मंदिरात भोंगे लावून हनुमान चालीसा पठण करण्यात यावे, असे आवाहन आमदार रवी राणा यांनी केले आहे. ज्या मंदिरांमध्ये भोंग्यांची व्यवस्था नाही अशा सर्व मंदिरांमध्ये आम्ही भोंग्यांचे वाटप करणार असल्याचेही रवी राणा यांनी म्हटले आहे.