मुंबई : 'आशिकी' आणि 'आशिकी 2'च्या प्रचंड यशानंतर, प्रेक्षक या संगीतमय रोमँटिक चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची, 'आशिकी 3'ची आतुरतेनं वाट पाहत आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अशी चर्चा होती की, कार्तिक आर्यन 'आशिकी 3'मध्ये दिसणार आहे. आता असं दिसत आहे की, निर्मात्यांनी शेवटी थोड्या सस्पेन्ससह म्युझिकल रोमँटिक चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज केला आहे. टी सीरिजचे भूषण कुमार यांनी कार्तिक आर्यनच्या या म्युझिकल रोमँटिक चित्रपटाची पहिली झलक शेअर करून चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. मात्र या फर्स्ट लूक टीझरमध्ये कुठेही 'आशिकी 3'चा उल्लेख केलेला नाही.
कार्तिकच्या चित्रपटाचं फर्स्ट लूक रिलीज : कार्तिक आर्यननं देखील त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर फर्स्ट लूक शेअर केला आहे, यामध्ये तो खूपच इंटिन्स लूकमध्ये दिसत आहे. कार्तिक गिटार घेऊन स्टेजवर येतो आणि गाणं सुरू करतो. कार्तिक आर्यनच्या आगामी संगीतमय रोमँटिक चित्रपटाचा फर्स्ट लूक आता चर्चेत आहे. तसेच या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. याशिवाय 'तू मेरी आशिकी है' हे गाताना, कार्तिक प्रेमात हताश झालेल्या प्रियकरासारखा दिसत आहे. या म्युझिकल रोमँटिक चित्रपटाचं टीझर रिलीज करताना कार्तिकनं त्याच्या पोस्टवर लिहिलं, 'ही दिवाळी.' या पोस्टमध्ये त्यानं अनुराग बसू, भूषण कुमार, प्रीतम यांनाही टॅग केलं आहे.
साऊथ सुंदरीबरोबर करेल रोमान्स : या संगीतमय रोमँटिक चित्रपटामध्ये साऊथ अभिनेत्री श्रीलीला ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच हा चित्रपट 2025 च्या दिवाळीला थिएटरमध्ये प्रदर्शित होईल. निर्मात्यांनी फर्स्ट लूकबरोबर चित्रपटाचं नाव सांगितलं नाही, पण लोक म्हणत आहेत की हा 'आशिकी 3' चित्रपट असू शकतो. कार्तिक बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटामुळे चर्चेत होता. 'तू ही आशिकी है...' सारखे बोल असल्यामुळे, अनेकजण या रोमँटिक संगीतमय चित्रपटाबद्दल सोशल मीडियावर चर्चा करत आहेत. दरम्यान अनेक चाहते कार्तिकच्या पोस्टवर आगामी चित्रपटाबद्दल त्याला विचारताना दिसत आहेत.
हेही वाचा :