Raj Thackeray Uttar Sabha : राज ठाकरेंच्या उत्तर सभेसाठी आले 'अयोध्येतील हनुमान' - राज ठाकरे हिंदुत्व
🎬 Watch Now: Feature Video
ठाणे : आज ठाण्यात होणाऱ्या राज ठाकरे यांच्या सभेसाठी ( Raj Thackeray Uttar Sabha Thane ) खास विशेष असा पोशाख घालून हनुमान चालीसा म्हणत उत्तर प्रदेशमधील अयोध्येतील अरुणवीर सिंग हे अवतरले ( Hanuman From Ayodhya ) आहेत. पालघरचे महाराष्ट्र सैनिक तुलसी जोशी यांचे मित्र अरुणवीर सिंग खास अयोध्येतून राज ठाकरे यांच्या सभेसाठी आले आहे. अयोधेतून रेल्वेने काल आल्यानंतर आज राज ठाकरे यांना ऐकण्यासाठी तेही उत्सुक आहेत. कारण राज ठाकरे यांनी घेतलेल्या हिंदुत्वाचा ( Raj Thackeray On Hindutwa ) मुद्दा हा त्यांना पटलेला आहे. त्यांच्यासोबत अयोध्येतील अनेक नागरिकांनी राज ठाकरे यांच्या हिंदुत्वाबाबतच्या भूमिकेला पाठिंबा देखील दिला असल्याचं त्यांनी सांगितले आहे. काही वर्षांपूर्वी राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांविरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे नाराज झालेल्या उत्तर भारतीयांमध्ये आता हिंदुत्वाचा मुद्दा घेतल्याने पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्या बाबतीत सहानुभूती निर्माण झाली आहे. हीच सहानुभूती आजच्या सभेच्या निमित्ताने देखील ठाण्यात पाहायला मिळाली. राज ठाकरे यांच्या सभेला कुठूनही पोहोचणारे पालघर येथील तुलसी जोशी हे दरवेळेस सभेमध्ये पोहोचता अनोख्या युक्त्यांचा वापर करतात. जेणेकरून राज ठाकरे यांची भूमिका नागरिकांना समजावी, असा प्रयत्न तुलसी जोशी यांचा असतो. त्याचमुळे आजही सभेच्या आधी हनुमानाच्या अवतारात हनुमान चालीसा म्हणत आलेले हनुमान हे सभेच्या ठिकाणी चर्चेचा विषय झाले होते.