Womens European Championship : इंग्लंडने जिंकली महिला युरो चॅम्पियनशिप; पहा, कसा केला लोकांनी जल्लोष - महिला युरोपियन चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद
🎬 Watch Now: Feature Video
इंग्लंडने अतिरिक्त वेळेपर्यंत चाललेल्या सामन्यात जर्मनीचा 2-1 असा पराभव करून ( England beat Germany 2-1 ) महिला युरोपियन चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद ( Womens European Championship Football Tournament title ) पटकावले. इंग्लंड अपेक्षांच्या दबावाखाली येईल असे वाटत असतानाच चोले केलीने 110व्या मिनिटाला गोल केला, जो निर्णायक ठरला. केलीच्या गोलपूर्वी इंग्लंडचे खेळाडू खूप थकलेले दिसत होते आणि त्यांना जर्मन बदली खेळाडूंविरुद्ध लढावे लागले. निर्धारित वेळेपर्यंत सामना 1-1 असा बरोबरीत होता. इंग्लंडतर्फे एला टूनने 62 व्या मिनिटाला, तर लीना मॅगुलने 79व्या मिनिटाला जर्मनीसाठी बरोबरीचा गोल केला. विजयानंतर इंग्लंडच्या खेळाडूंनी आणि लोकांनी जोरदार जल्लोष साजरा केला.