Video : पाण्याचा अंदाज न आल्याने तलावात घुसली कार - कार तलावात अडकली
🎬 Watch Now: Feature Video
ठाणे - खर्डी गाव दिवा येथे रस्त्याचा आणि पाण्याचा अंदाज न आल्यामुळे एक मारुती सुझुकी सेलेरो कार तलावाच्या पाण्यामध्ये अडकली ( Car Drown In Lake ) . यात कारमध्ये कारचालक युसुफ पठाण यांना लागलीच स्थानिक नागरिकांनी बाहेर काढले. वाहन चालकाने दिलेल्या माहितीनुसार या वाहनात इतर कोणीही नव्हते ( No One In The Car ). त्यामुळे, मोठी दुर्घटना टळली. दिवा खर्डी रस्ता हा आधीच वाईट परिस्थितीत आहे. त्यातच रस्त्याच्या शेजारी असलेल्या लाईट्स नसल्यामुळे वाहनचालकांचा अपघात होण्याची शक्यता स्थानिक नागरिक वर्तवत आहेत. काल रात्री देखील असाच प्रकार या भागात झाला आणि फडके तलावामध्ये सिल्वर कार्ग घुसली नशीब बलवत तर म्हणून चेंबूर येथे राहणारे युसुफ पठाण हे वाचले. अन्यथा त्यांना देखील तलावात जलसमाधी मिळाली असती. या प्रकरणानंतर घटनास्थळी अग्निशामक दल आणि रेस्क्यू टीम ( Firefighters and rescue team ) उपस्थित झाल्या त्यांनीही कार तलावातून बाहेर काढली ( car pulled out of pool ).