Ajit Pawar : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शरद पवारांचा शिवसेनेला शब्द : अजित पवार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेने आपली कंबर कसली ( Sharad Pawar Promice To Shivsena ) आहे. याआधी राज्यसभेच्या जागेसाठी शिवसेनेने मोठं मन करून राष्ट्रवादी काँग्रेसला मदत केली ( Rajya Sabha Sixth Seat Maharashtra ) होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( NCP Chief Sharad Pawar ) यांनी पुढच्या वेळेस शिवसेनेला मदत करणार असल्याचे कबूल केले होते. त्याबाबत शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांच्यात नक्कीच चर्चा झाली असावी असे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मुंबईत दिले. तसेच सहाव्या जागेसाठी अपक्ष म्हणून इच्छुक असलेले छत्रपती संभाजी राजे ( Sambhaji Raje Chhatrapati ) यांना शरद पवार यांनी पाठिंबाबाबत काही चर्चा झाली असल्याची आपल्याला कल्पना नसल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. मुंबईमध्ये आज पत्रकार परिषदेत ते बोलत होते.