पुणे : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी तसंच या घटनेचा निषेध करण्यासाठी, सकल मराठा समाजाकडून आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले होते. तसंच विविध पक्षाचे राजकीय नेते, देशमुख कुटुंबाचे सदस्य देखील मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी एक धक्कादायक माहिती दिली आहे.
सीआयडी कार्यालयात चुकीची वागणूक दिली : "आम्हाला न्याय पाहिजे म्हणून आज आम्ही न्याय मागण्यासाठी आलो आहोत. जे काही झालं आहे ते अत्यंत चुकीचं आहे. तसेच मी जेव्हा सीआयडी कार्यालयात गेलो होतो, तेव्हा मला बालाजी तांदळे यांच्याकडून चुकीची वागणूक देण्यात आली. अर्वाच्च भाषेत माझ्याशी बोललं गेलं" अशी धक्कादायक माहिती, धनंजय देशमुख यांनी दिली.
"माझी एवढीच मागणी आहे की, आरोपींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. आम्ही येथे न्याय मागण्यासाठी आलो असून आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. तसेच जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. त्याचबरोबर ज्यांनी कोणी आरोपींना आश्रय दिलं आहे, त्यांच्यावर देखील कठोर कारवाई व्हायला पाहिजे". - वैभवी देशमुख, संतोष देशमुख यांची मुलगी
मारेकऱ्यांना फाशी व्हायला पाहिजे : खासदार बजरंग सोनवणे हे देखील आज मोर्चामध्ये सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी. तसेच वाल्मीक कराडला देखील खुनाच्या गुन्ह्यात सहआरोपी केलं पाहिजे, अशी मागणी बजरंग सोनवणे यांनी केली आहे.
हेही वाचा -